Gold Silver Today : काय आहे तुमच्या शहरातील आजचा सोने-चांदीचा भाव? घ्या तपासून

ऑगस्ट 13, 2022 11:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे (Gold Silver Rate) वरखाली होत असल्याचे दिसून येतंय. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे गुंतवणूकदार धास्तावले असून यामुळे त्यांचा मोर्चा सोन्याकडे वळला आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 52461 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तसेच दुसरीकडे चांदीची किंमत 59,420 रुपये प्रति किलोवर आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

gold silver (3)

जळगावमधील आजचा दर काय आहेत?
जळगावमध्ये आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ५२,७०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेटचा भाव ४८,२७० रुपये इतका आहे. तसेच चांदीचा प्रति किलोचा दर ५९,७०० रुपये इतका आहे. दरम्यान, रेकॉड स्तरापासून सोने जवळपास ४ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रति किलोवर गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोने ४ हजर रुपयांनी घसरले आहे.

महाराष्ट्रातील दर?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now