⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

सोने-चांदीच्या घसरणीला ब्रेक, आज किती रुपयाने महागले ; वाचा ताजे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर काल गुरुवारी सोन्याच्या (Gold Rate) भावात घसरण झाली होती. सोबतच चांदीही (Silver Rate) घसरली होती. मात्र आज या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज सोने किंचित १०० रुपयांनी वाढले आहे. तर चांदी २३० रुपयांनी महागली आहे. त्यापूर्वी कालच्या सत्रात सोने २०० रुपयापर्यंत तर चांदी ४५० रुपयापर्यंत घसरली होती. Gold Silver Rate Today

आजचा सोने-चांदीचा भाव?
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढून ५२,४२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तसेच दुसरीकडे चांदीची किंमत २३० वाढून ५८,६०० रुपये प्रति किलोवर अली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील आजचा दर काय आहेत?
जळगावमध्ये आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ५२,७०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेटचा भाव ४८,२७० रुपये इतका आहे. तसेच चांदीचा प्रति किलोचा दर ५९,७०० रुपये इतका आहे.

दरम्यान, रेकॉड स्तरापासून सोने जवळपास ४ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रति किलोवर गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोने ४ हजर रुपयांनी घसरले आहे.

महाराष्ट्रातील दर?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)