⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

आगामी काळात सोने आणखी महागणार? जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । सोने आणि चांदीच्या (Silver Rate) भावात चढ-उतार सुरूच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव १६० रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात २०० रुपयाची वाढ झाली आहे.

काय आहे आजचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,९७० रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ५८,४७० रुपये इतका आहे. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर दिवसातून दोन वेळा जाहीर केले जातात. सकाळ आणि दुपारी अशा दोन सत्रात जाहीर होतात.

दरम्यान, आगामी काळात अमेरिकेतील महागाईचा आकडा, डॉलर इंडेक्स, फेडरल रिझर्व एक्शन आणि आर्थिक मंदी बाबतची माहिती याचा संपूर्ण परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येऊ शकतो. त्यामुळे भारतात सोने भावात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात किंचित वाढ दिसून आली तर चांदीच्या भावात घसरण दिसून आली.

गेल्या आठवड्यातील सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचे भाव वाढले होते. सरकारने सोन्यावर आयत शुल्क (Import Duty) वाढवले आहे. त्याचा परिणाम दिसून आला होता. या दोन दिवसात सोने तब्बल १६४० रुपयांनी महागले होते. त्यानंतर मात्र बुधवार आणि गुरुवारी सोन्याच्या भावात घसरण झाली होती. त्यावेळी देखील सोने १६०० रुपयांहून अधिकने घसरले होते. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात तीन वेळा वाढ आहे तर दोन वेळा घसरले आहे. चांदीच्या दारात दोन वेळा वाढ तर तीन वेळा घसरण झाली आहे. या आठवड्यात चांदीच्या भावात मात्र जवळपास दीड हजार रुपयाची घसरण दिसून आलीय.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
०४ जुलै २०२२ – रुपये ५३,१३० प्रति १० ग्रॅम
०५ जुलै २०२२ – रुपये ५३,३४० प्रति १० ग्रॅम
०६ जुलै २०२२ – रु ५२,५०० प्रति १० ग्रॅम
०७ जुलै २०२२ – रु ५२,६८० प्रति १० ग्रॅम
०८ जुलै २०२२ – रु ५१,८१० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
०४ जुलै २०२२- रुपये ५९,१०० प्रति किलो
०५ जुलै २०२२ – रुपये ५९,८६० प्रति किलो
०६ जुलै २०२२- रुपये ५८,२०० प्रति किलो
०७ जुलै २०२२- रुपये ५८,०६० प्रति किलो
०८ जुलै २०२२- रुपये ५८,२७० प्रति किलो

अशी तपासा सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.