Gold Silver Today : सोने-चांदीच्या किंमतीत घसरण, वाचा आजचा १० ग्रॅमचा दर

जून 10, 2022 10:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । सलग दोन दिवस वाढ झाल्याने आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने दरात किंचित घसरण दिसून आलीय. तर सलग तिसऱ्या दिवशी चांदी स्वस्त झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ५० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात ६३० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी कालच्या सत्रात सोने ९० रुपयाने महागले होते. तर चांदी २२० रुपयांनी स्वस्त झाली होती.

gold rate 2

आज जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५२,२०० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६२,८५० रुपयावर आला आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत पहायला मिळते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर खाली होत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांवर गेला होता. त्यातुलनेत सोनं जवळपास ५००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

पाच दिवसात सोने तीन वेळा स्वस्त दोन वेळा महागले आहे. तर चांदी चार वेळा स्वस्त तर एक वेळा महागली आहे. चार दिवसात सोने जवळपास १०० रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे चांदी ९०० रुपयांनी घसरली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोने ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. चांदी देखील ३०० ते ३५० रुपयांपर्यंत महागली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
६ जून २०२२- रुपये ५२,१६० प्रति १० ग्रॅम
७ जून २०२२ – रुपये ५२,०६० प्रति १० ग्रॅम
८ जून २०२२ – रु ५२,१६० प्रति १० ग्रॅम
९ जून २०२२ – रु ५२,२५० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
६ जून २०२२- रुपये ६३,११० प्रति किलो
७ जून २०२२ – रुपये ६३,७६० प्रति किलो
८ जून मे २०२२- रुपये ६३,७०० प्रति किलो
९ जून मे २०२२- रुपये ६३,४८० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now