---Advertisement---
वाणिज्य

गणेश चतुर्थीनंतर सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ सप्टेंबर २०२२ । गणेश चतुर्थीनंतर खुल्या बाजारात पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today News) महिन्याच्या पहिल्याच दिवशी घसरण दिसून आली. 31 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,000 रुपये झाला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,270 रुपये होता. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,500 रुपये झाला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,730 रुपये इतका आहे. तर चांदीच्या भावात वाढ झाली असली तरी चांदीचे दर अजूनही आटोक्यात आहेत. चांदीचा आजचा भाव एका किलोसाठी 51,600 रुपये इतका आहे.

gold silver 1 jpg webp

राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,500 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,730 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,530 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,760 रुपये आहे.

---Advertisement---

नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,530 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,760 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,530 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,760 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 516 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---