⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

खुशखबर… ९ महिन्यानंतर चांदी ६० हजाराखाली ; तपासा आजचा सोने-चांदीचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । सोने-चांदी (Gold Silver Rate) खरेदीचा विचार करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज शुक्रवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात २२० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ७५० रुपयांनी घसरला आहे. दरम्यान, आजच्या घसरणीनंतर चांदीचा भाव तब्बल ९ महिन्यानंतर ६० हजाराखाली आला आहे. Gold Silver Rate Today

आजचा सोने-चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,७०० रुपयांपर्यंत खाली आला. तर एक किलो चांदीचा भाव ५९,७०० रुपये इतका आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव एका विशिष्ट पातळीवरून वरखाली होत असताना दिसून येतेय. गेल्या महिन्याच्या १ जून रोजी सोन्याचा ५२,०५० रुपये इतका भाव होता. तो काल ३० जून रोजी ५१,९२० रुपये इतका होता. एकंदरीत महिन्याभरात सोन्याच्या भावात मोठी हालहाल दिसून आली असून किंचित घसरण दिसून येतेय.

तर दुसरीकडे १ जून रोजी चांदीचा भाव ६२,५६० इतका होता. तो ३० जून रोजी घसरून ६०,४५० रुपये प्रति किलो इतका होता. एकंदरीत जून महिन्यात चांदीच्या भावात २ हजाराहून अधिकने घसरला आहे. दरम्यान, आजच्या घसरणीनंतर चांदीचा भाव ६० हजाराखाली आला आहे. यापूर्वी हा हर ३० सप्टेंबर २०२१ रोजी चांदीचा भाव ५९,७५० रुपये इतका होता. तो आज १ जुलै २०२२ रोजी ५९,७०० रुपयांवर आला आहे.

या आठवड्यात सोन्याच्या भावात किंचित १०० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात मात्र मोठी घसरण झाली आहे. चांदी १२०० ते १३०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोन्याचा भाव वाढू शकतो
तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशियाने जी 7 देशांमध्ये सोन्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, त्यानंतर बाजारात सोन्याचा पुरवठा कमी होईल आणि मागणी वाढेल. खरतर रशिया हा सोन्याचा मोठा निर्यातदार देश असून तिथून होणारी आयात थांबवल्याचा परिणाम भारतासह जगभरातील बाजारपेठांवर होणार आहे. आगामी काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२७ जून २०२२- रुपये ५१,८१० प्रति १० ग्रॅम
२८ जून २०२२ – रुपये ५१,८४० प्रति १० ग्रॅम
२९ जून २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम
३० जून २०२२ – रु ५१,९२० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२७ जून २०२२- रुपये ६१,१५० प्रति किलो
२८ जून २०२२ – रुपये ६१,३५० प्रति किलो
२९ जून मे २०२२- रुपये ६०,९३० प्रति किलो
३० जून मे २०२२- रुपये ६०,४५० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते