ग्राहकांसाठी खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला, पहा नवीन दर?

मार्च 30, 2026 10:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२६ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत असून मागील आठवड्यात सोन्याचा भाव घसरला होता. त्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळच्या सत्रातही सोन्याच्या दरात घसरण दिसून आलीय. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

gold silver 2 jpg webp

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून या दरम्यान सोन्यासह चांदीला मोठी मागणी असते. मात्र यंदा दोन्ही धातूंमध्ये मोठी उसळी दिसून आली. सोन्याच्या एका तोळ्याचा भाव अद्यापही दीड लाख रुपयांजवळ आहे. मात्र उच्चांकीपासून सोन्यासह चांदीचे चांगलेच घसरले आहे. आज देखील दर घसरले आहेत त्यामुळे सोनं खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे.

आजचे सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८१० रुपयांनी घसरून १,४७,२८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६४८ रुपयांनी घसरले असून १,१७,८२४ रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ७५० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,३५,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६०० रुपयांनी घसरले आहेत हे दर १,०८,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१०,४६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४८८ रुपयांनी घसरले आहेत. हे दर ८८,३६८ रुपये झाले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now