अरे बापरे! सोने 11 हजारांनी तर चांदी 30 हजारांनी महागली, नवीन दर पाहूनच उडतील होश

जानेवारी 29, 2026 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२६ । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावर दिसून येत असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असणाऱ्या सोने, चांदीच्या दरांनी आज मागील सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहे. आज सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातूंच्या दरात मोठी वाढ दिसून आली. यामुळे चांदीच्या दराने ४ लाख रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. तर सोन्याच्या दरही सव्वादोन लाखाच्यावर गेला आहे. यामुळे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

gold silver 1 jpg webp

सोन्याचा दर
goodreturns संकेतस्थळानुसार, २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर तब्बल ११,७७० रुपयांनी वाढून १,७८,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्यात १०,८०० रुपयाची वाढ होऊन ते १,६३,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. आज सोन्याच्या दराने ऐतिहासिक पातळी गाठली आहे.

Advertisements

चांदीचा दर
सोन्यासोबतच आज चांदी दरातही प्रचंड वाढ झाली आहे. आज सकाळी बाजार उघडताच चांदीचा एक किलोचा भाव ३०,००० रुपयांनी वाढून ४,१०,००० रुपयांवर पोहोचला.

Advertisements

दरवाढीचे कारण काय?
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण, मध्यपूर्वेतील तणाव तसेच गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी पाहायला मिळते आहे. दर उच्चांकावर पोहोचल्याने लग्नसराई, सण-उत्सव तसेच शुभकार्यांसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now