चांदी दरवाढीचा भडका ! बाजार उघडताच भाव ‘इतक्या’ हजारांनी वाढला, सोने..

जानेवारी 27, 2026 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२६ । गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीचे दर सातत्यानं वाढताना दिसत आहे. यामुळे दोन्ही धातूंच्या दराने ऑलटाइम हाय गाठला आहे. सर्वसामान्य लोकांच्या आवक्याच्या बाहेर जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांची घोडदौड अजूनही थांबलेली नाही.

Silver

आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी देशांतर्गत वायदा बाजारात चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. दुसरीकडे सोन्याचा दर स्थिर दिसून आला. goodreturns संकेतस्थळानुसार, आज चांदी दरात १० हजार रुपयाची वाढ दिसून आली. यामुळे चांदीचा एक किलोचा दर ३,७०,००० रुपयावर पोहोचला आहे.

Advertisements

२४ कॅरेट सोन्याचा दर १,६१,९५० रुपये प्रति तोळा इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,४९,१५० रुपयांवर स्थिर आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा१,२२,०३० रुपये आहे.

Advertisements

सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. आज किमती न वाढल्यामुळे जे ग्राहक दागिने खरेदीचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आजचे दर महत्त्वाचे ठरतील. तथापि, हे दर जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्जेस विरहित आहेत, याची नोंद घ्यावी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now