जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२५ । आगामी सणासुदीपूर्वीच सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील दोन्ही धातूंच्या किंमतींत वाढ झाली. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १ हजार रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. तर चांदीचा दर देखील २००० हजार रुपयांनी वधारला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे.

२४ कॅरेट १ तोळा सोन्याचा दर
गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१४० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला तब्बल १, ०१,२९० रुपये खर्च करावे लागणार आहेत. काल हेच सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,००,१५० रुपये द्यावे लागले.

२२ कॅरेट १ तोळा सोन्याचा दर
आज २२ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात १,०५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९२,८५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. काल हेच सोनं ९१,८०० रुपयांना मिळत होते.
दुसरीकडे आज चांदीचे दर देखील वाढले आहेत. १ किलो चांदी २००० रुपयांनी महागली आहे. आज १ किलो चांदीचा दर १,१८,०० रुपये इतक झाला आहे.











