Gold Rate : सोन्याचा दर आता नवीन उच्चांक गाठणार? सलग तिसऱ्या दिवशी भाववाढ

जानेवारी 22, 2025 11:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याला (Gold Rate) झळाळी पाहायला मिळाही होती. तज्ज्ञांनी सोन्याचा दर ९० हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यातच काही दिवसापासून सोने दरात होत असलेली वाढ खरंच नवीन उच्चांक गाठणार का? अशी चिंता आता ग्राहकांना पडली आहे. Gold Rate Today

GS22 January

सोमवारी सोन्याच्या दरात वाढ पहायला मिळाली. यानंतर काल म्हणजेच मंगळवारी देखील सोन्याचे भाव वाढले होते. तर आज बुधवारी म्हणजेच सलग तिसऱ्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होताच त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा थेट परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. आज बुधवारी म्हणजेच आज २२ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. २२ कॅरेट सोन्याचा दर ७५,४०० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ८२,२५० रुपये इतका आहे. दरम्यान चांदी दरात देखील १००० ते ११०० रुपयापर्यंतची वाढ झाली असून यामुळे चांदीचा दर ९४००० रुपयापर्यंत पोहोचला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now