सोने - चांदीचा भाव

सोने पुन्हा भडकले! एकाच दिवसात प्रति तोळा १३१० रुपयांची मोठी वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२६ । जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या राजकीय तणावाचा थेट फटका पुन्हा एकदा भारतीय ग्राहकांना बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता; मात्र हा दिलासा फार काळ टिकू शकला नाही.

gold rate 2

आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी आली असून, प्रति तोळ्यामागे (१० ग्रॅम) चक्क १३१० रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटका बसला आहे.

सोन्याच्या दरातील या अचानक झालेल्या दरवाढीमागे इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता युद्धजन्य तणाव हे मुख्य कारण आहे. या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. या युद्धाच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने जागतिक स्तरावर महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजार किंवा इतर जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी जगभरातील गुंतवणूकदार ‘सोने’ या सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत. मागणीत अचानक मोठी वाढ झाल्याने सोन्याचे दर पुन्हा भडकले आहेत.

आजचे सोन्याचे दर

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १३१० रुपयांनी महागले असून हे दर १,५८,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १०४८ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२६,६८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १३,१०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १५,८३,५०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर १२०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४५,१५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ९६० रुपयांनी महागले असून हे भाव १,१६,१२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १२ हजारांची वाढ होऊन हे दर १४,५१,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

१८ कॅरेट सोन्याचे दर ९८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१८,७६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८४ रुपयांनी वाढले असून हे दर ९५,००८ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोनं ९,८०० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ११,८७,६०० रुपये झाले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button