जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२६ । या आठवड्यात सोने दरवाढीला ब्रेक लागल्याचं दिसून आले. सलग चार दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र आज शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. मात्र दुसरीकडे चांदी दरात मोठी घसरण झाली.

आज सकाळी २४ तोळा सोनं प्रति तोळा १९७० रूपयांनी वाढले आहे. आज व्हॅलेंटाईन डे असून या निमित्त प्रिय व्यक्तीला सोन्याचे दागिने गिफ्ट करण्याचा प्लॅन करणाऱ्यांना धक्का बसला आहे. देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून लग्नसराईत सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहक चिंतेत आहेत.

आजच्या सोन्याच्या किंमती किती ?
२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १५७,७५० रुपये इतकी झाली आहे. यामध्ये १९७० रूपयांची वाढ नोंदवली गेली. काल शुक्रवारी प्रति १० ग्रॅम १५५,७८० रुपये इतकी किंमत होती.
२२ कॅरेट सोन्याच्या किमतीमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रति १० ग्रॅम ₹१४४,६०० आहे. शुक्रवारच्या तुलनेत १८०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.
१८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹११८,३१० रूपये इतकी झाली आहे. १४७० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ११६८४० रूपये इतकी होती.

चांदीचा दर
आज सोने महागले असले तरी दुसरीकडे चांदी दरात मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी सराफ बाजार उघडताच चांदी दरात प्रति किलो ५००० रुपयांची घसरण झाली. यामुळे आता एक किलो चांदीचा दर २,७५,००० रुपयावर पोहोचला आहे.
व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्णनगरीत रोज गोल्डचे आकर्षक दागिने
दरम्यान, सोन्या चांदीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रियजनांना मौल्यवान अशी भेट काय द्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कारण सोन्याच्या वाढत्या भावामुळे अनेकजण आता 22 व 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यान ऐवजी रोज गोल्ड च्या दागिन्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्ण नगरीमध्ये ही आकर्षक असे रोज गोल्डचे दागिने दाखल झाले.









