⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सोने-चांदीच्या भावात वाढ ; जाणून घ्या आज कितीने महागले सोने

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । जळगावात सराफ बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ दिसून आली. आज २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या प्रति किलो मागे ५६० रुपयाची वाढ झालीय. त्यापूर्वी काल सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४३० रुपयाची वाढ झाली होती; तर चांदीच्या प्रति किलो मागे २२० रुपयाची वाढ झाली होती.

आजचा सोने-चांदीचा भाव

आज मंगळवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,१४० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,४०० रुपये इतका आहे.

मागील गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास १५०० ते १६०० रुपयाची वाढ झालीय. तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. गेल्या महिन्यात चांदीच्या भावात ५५०० हजार रुपयाची वाढ झालीय. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने धनत्रयोदशीला सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा अपूर्व उत्साह पाहायला मिळाला. गेल्या मंगळवारी धनत्रयाेदशीला सुवर्णनगरी जळगावात किमान ३५ ते ४० काेटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

गेल्या आठवड्यात सोने तीन वेळा स्वस्त तर दोन वेळा महागले आहे. जळगावच्या सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी (१ नोव्हेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८,७५० रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे ६६,०५० रुपये नोंदवले गेले. धनत्रयोदशी दिवशी मंगळवारी (२ नोव्हेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४९ हजार ३० रुपये नोंदवले गेले, आणि चांदीचे दर किलोमागे ६६ हजार ३१० रुपये नोंदवले गेले.

बुधवारी (३ नोव्हेंबर) सोन्याचे भाव जवळपास २९० रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८ हजार ७४० रुपये नोंदवले गेले, तर चांदीमध्ये १७०० रुपयांची घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर ६४ हजार ७१० रुपये नोंदवले गेले. गुरुवारी (४ नोव्हेंबर) म्हणजेच दिवाळीच्या दिवशीही सोने-चांदी स्वस्त होते. २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८ हजार १०० रुपये नोंदवले गेले, चांदीचे दर किलोमागे ६३,९३० रुपये नोंदवले गेले.