⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सोने-चांदी पुन्हा महागली ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ नोव्हेंबर २०२१ । जळगावात सराफ बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीचे भाव वाढले आहे. आज सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४३० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या प्रति किलो मागे २२० रुपयाची वाढ झालीय. दिवाळीनंतर सोने-चांदीचे दर पुन्हा वाढताना दिसून येत आहे.

आजचा सोने-चांदीचा भाव 

जळगावात सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून आली. आज सोमवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,१०० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६५,४८० रुपये इतका आहे.

गेल्या आठवड्यात सोने तीन वेळा स्वस्त तर दोन वेळा महागले आहे. जळगावच्या सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी (१ नोव्हेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८,७५० रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे ६६,०५० रुपये नोंदवले गेले. धनत्रयोदशी दिवशी मंगळवारी (२ नोव्हेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४९ हजार ३० रुपये नोंदवले गेले, आणि चांदीचे दर किलोमागे ६६ हजार ३१० रुपये नोंदवले गेले.

बुधवारी (३ नोव्हेंबर) सोन्याचे भाव जवळपास २९० रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८ हजार ७४० रुपये नोंदवले गेले, तर चांदीमध्ये १७०० रुपयांची घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर ६४ हजार ७१० रुपये नोंदवले गेले. गुरुवारी (४ नोव्हेंबर) म्हणजेच दिवाळीच्या दिवशीही सोने-चांदी स्वस्त होते. २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८ हजार १०० रुपये नोंदवले गेले, चांदीचे दर किलोमागे ६३,९३० रुपये नोंदवले गेले.

भाव वाढण्याचा अंदाज

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.