⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आजचा सोने-चांदीचा भाव : ७ नोव्हेंबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । जळगावात सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून आली. आज रविवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५८० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६८,७०० रुपये इतकी आहे. दरम्यान, दिवाळीनंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढताना दिसून येत आहे.

जळगावच्या सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८,७५० रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे ६६,०५० रुपये नोंदवले गेले. धनत्रयोदशी दिवशी मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४९ हजार ३० रुपये नोंदवले गेले, आणि चांदीचे दर किलोमागे ६६ हजार ३१० रुपये नोंदवले गेले.

बुधवारी (३ नोव्हेंबर) सोन्याचे भाव जवळपास २९० रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८ हजार ७४० रुपये नोंदवले गेले, तर चांदीमध्ये १७०० रुपयांची घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर ६४ हजार ७१० रुपये नोंदवले गेले. गुरुवारी म्हणजेच दिवाळीच्या दिवशीही सोने-चांदी स्वस्त होते. २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८ हजार १०० रुपये नोंदवले गेले, चांदीचे दर किलोमागे ६३,९३० रुपये नोंदवले गेले.

मागील गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास १५०० ते १६०० रुपयाची वाढ झालीय. तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. गेल्या महिन्यात चांदीच्या भावात ५५०० हजार रुपयाची वाढ झालीय. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने धनत्रयोदशीला सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा अपूर्व उत्साह पाहायला मिळाला. मंगळवारी धनत्रयाेदशीला सुवर्णनगरी जळगावात किमान ३५ ते ४० काेटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

गतवर्षीपेक्षा दर कमी

सराफ बाजारात नेहमी चढउतार पाहण्यास मिळत असतात. सोन्‍याचे दर सातत्‍याने वाढत असतात. यंदा मात्र चित्र उलटे असून सोन्‍याचे दर कमी झाले आहेत. याउलट गतवर्षी जळगाव सुवर्णबाजारात सोन्‍याचे दर ५१ हजाराच्‍या वर पोहचले होते. यंदा मात्र ते खाली आले असून ४८ हजार ५०० रूपयांपर्यंत आले आहेत.