⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

खरेदीची संधी.. सोने रेकॉर्ड स्तरापेक्षा ७११० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही दिवसात जळगाव सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोनं तीन वेळा महागलं आहे. त्यात प्रति १० ग्रॅम ९७० रुपयाची वाढ दिसून आली तर वेळा स्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील तीन वेळा वाढ झाली असून त्यात १३३० रुपयाची वाढ दिसून आली तर दोन वेळा घट झाली. चांदीच्या भावात प्रति किलो १४२० रुपयाची घट दिसून आली. म्हणून या आठवड्यात चांदीच्या भावात किंचत घट झालीय.

दरम्यान, २०२० मध्ये सोन्याच्या किंमतीने सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यावर सोन्याची प्रतितोळा किंमत ५६,२०० रुपयांवर पोहोचली होती. आजच्या दरानुसार सोन्याची किंमत ४९,०९० रुपये प्रतितोळा इतकी आहे. त्यामुळे सोने रेकॉर्ड स्तरापेक्षा ७११० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर चांदीच्या दरात घसरण होऊन त्याची किंमत प्रतिकिलो ६६,४५० रुपये इतकी झाली आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति तोळा ४७ हजाराच्या घरात असलेला सोन्याचा भाव ४९ हजारांवर गेला आहे.  सध्या सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याच्या दागिने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. तसेच इतर औद्योगिक क्षेत्रातील सोने खरेदीचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव वाढीकडे झुकलेले दिसून येत आहेत. दिवळीनंतर हे भाव आणखी वाढणार असल्याचे संकेत जाणकारांनी दिले आहेत.

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव ५७ हजार रुपयांवरून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्या सुरू असलेल्या किमती ८ ते १०  हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. चांदीचा विचार केल्यास त्यातही मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत किंवा वर्षअखेरीस चांदीचे भाव ७६,००० ते ८२,००० रुपये प्रतिकिलोपर्यंत जातील, असे बहुतांश व्यापाऱ्यांचे मत आहे.

या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (२५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९२० होते, त्यात ४०० रुपयाची वाढ नोंदविली गेली होती. मंगळावारी (२६ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० इतका होता. त्यात ४४१० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२७ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,९३० रुपये इतका आहे. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे. शुक्रवार  (२९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे.