⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आजचा सोने-चांदीचा भाव : ३० नोव्हेंबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । एकीकडे दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटमुळे सोने महागण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी आज जळगाव सराफ बाजारात सोन्याचा भाव स्थिर आहे. काल आठवडयाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात वाढ दिसून आली होती. परंतु आज सोन्याचा भाव जैसे थे आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालीय. आज चांदी प्रति किलो ४२० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल चांदीच्या भावात ११३० रुपयाची घसरण झाली होती.

आजचा जळगावातील सोने-चांदीचा भाव :

आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव १७० रुपयांनी वाढून तो ४८,७०० रुपयांवर गेला आहे. तर चांदी भाव ११३० रुपयांनी स्वस्त होऊन ६३,०८० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटमुळं जगभरात भीतीचं वातावरण असून यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे. काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भावात वाढ दिसून आली होती. परंतु दुसरीकडे मात्र, चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली दिसून आली.

कोरोनाचा आतापर्यंतचा घातक विषाणू आढळून आल्यानंतर जगभरात प्रचंड खळबळ माजली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे.आज सोमवारी सोने ३६० रुपयांनी महागले तर चांदीमध्ये ६५० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान येणाऱ्या काळात सोन्याच्या दरामध्ये आणखी तेजी येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अल्पकालावधीसाठी सोन्यामध्ये केलेली गुंतवणुक अधिक नफा मिळून देऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यात इतक्या रुपायांनी स्वस्त झालं सोनं-चांदी?

गेल्या आठवड्यात जळगावात सराफ बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्याचा भावात १६८० रुपयांची घसरण झाली होती. तर दुसरीकडे या आठवड्यात चांदी ३ वेळा स्वस्त झाली आहे तर दोन वेळा महागली आहे. त्यात ३५५० रुपयांची घसरण दिसून आली होती.

तर नोव्हेंबरच्या सुरुवातीला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४८,७५० रुपये इतका होता. त्यानंतर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव काहीसा स्थिर होता. परंतु दिवाळीनंतर सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं दिसून आलं. ११ नोव्हेंबर ला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५० हजार रुपयांवर गेला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव घसरताना दिसून आला.

सध्या सराई सुरु असल्यामुळे सोने चांदीच्या भावात मागणी वाढू लागली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने प्रति तोळा ५६ हजारांवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या सोन्याच्या भावात ७५०० रुपयाची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरानाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे आताच स्वस्तात सोने खरेदी संधी आहे.

गेल्या आठवड्यातील सोने-चांदीचे दर?

२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे. २५ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१०० रुपये इतका आहे. २६ नोव्हेंबर (शुक्रवारी) सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे. २७ नोव्हेंबर शनिवार सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.