सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण, स्वस्तात खरेदी संधी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता सोने खरेदी करणे पुन्हा एकदा स्वस्त झालेय. जळगाव सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली. आज १० ग्रॅम सोने तब्बल ५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी प्रति किलो २११० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोने ९२० रुपयांनी तर चांदी प्रति किलो १०१० रुपयांनी स्वस्त झाली होती. दरम्यान, सोने-चांदी स्वस्त होत असल्याने खरेदीची ही सुवर्णसंधी आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आज बुधवार सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५५० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,९७० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या महिन्यापासून सोने आणि चांदीचे भाव वधारताना दिसून आले. त्यामुळे यंदा ऐन सणासुदीत दोन्ही धातू महागले होते. सध्या सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे सोने-चांदीची मागणी पुन्हा वाढली आहे. असं असतानाही मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली.

गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात १६६० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात ३५५० रुपयाची घसरण झाल्याची दिसून येतेय. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्याने खरेदीदारांना खरेदीची ही चांगली संधी आहे.

तीन दिवसातील सोने आणि चांदीचे दर

२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. तर आज २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज