जळगावच्या सुवर्णपेठेत सोने पुन्हा 73 हजारावर,चांदीत वाढ, आजचे दर पहा..

ऑगस्ट 21, 2024 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२४ । सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोबतच चांदीचा दर देखील वाढू लागला आहे. जळगावच्या सुवर्णपेठ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात तेजी पाहायला मिळाली.

gold21august jpg webp

अलीकडेच अर्थसंकल्पानंतर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली होती,चांदीही स्वस्त झाली होती. पण जागतिक घडामोडीमुळे पुन्हा एकदा सोने भाव खाऊ लागले. जळगावच्या सुवर्णपेठेत गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर ७१ हजाराच्या खाली होता. तर चांदी ८३००० हजारावर होती.

परंतु या आठवड्याच्या सुरुवातीपासून दोन्ही धातूंमध्ये वाढ पाहायला मिळाली. कालच्या किमतीपेक्षा आज सोन्याच्या दरात ५०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आलीय. यामुळे आता जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ६७,१०० रुपये इतका आहे. कालच्या सकाळच्या सत्रात ६६,६०० रुपये इतका होता. तर २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७३,२०० रुपये इतका आहे. काल सकाळी हा दर ७२,६५० रुपये रुपये इतका होता. गेल्या आठवड्याभरात सोने २४०० ते २५०० रुपयांनी वाढले आहे.

दुसरीकडे चांदीचा दर देखील वाढला आहे. दिवसभरात चांदीचा दर एक हजाराने वाढला असून यामुळे आता एक किलो चांदीचा दर ८७,००० रुपयांवर पोहोचला आहे.

सोने दरवाढीचे कारण काय?
यूएस फेड मिनिट्स आणि यूएस फेडच्या दर कपातीची चर्चा आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता सोन्याच्या दरांवर मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now