⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

सोने पन्नाशीच्या दिशेने ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । दिवाळीच्या कालावधीत जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात काहीशी घसरण झालेली दिसून आली. तसेच चांदीच्या दरातही चढ-उतार सुरु होता. मात्र दिवाळीनंतर सोन्याच्या दरात काहीशी वाढ होताना दिसत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भाव वाढीला आज ब्रेक लागला आहे. आज चांदीचा स्वस्त झाली आहे. आज बुधवारी १० ग्रॅम सोने २८० रुपयाने महागले आहे, तर चांदी प्रति किलो ३२० रुपयांनी स्वस्त झालं आहे. दरम्यान, सततच्या दरवाढीने सोने पन्नास हजार रुपयांच्या दिशेने जाऊ लागले आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आज बुधवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,४२० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,०८० रुपये इतका आहे.

मागील गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास १५०० ते १६०० रुपयाची वाढ झालीय. तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. गेल्या महिन्यात चांदीच्या भावात ५५०० हजार रुपयाची वाढ झालीय. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने धनत्रयोदशीला सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा अपूर्व उत्साह पाहायला मिळाला. मंगळवारी धनत्रयाेदशीला सुवर्णनगरी जळगावात किमान ३५ ते ४० काेटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

मागील आठवड्यातील ट्रेंड

जळगावच्या सराफा बाजारात मागील आठवड्यातील सोने आणि चांदीच्या दरातील ट्रेंड काहीसा चढ-उताराचा दिसून आला. तो पुढील प्रमाणे-
– ०१ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०५० रुपये असा होता.
-०२ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,३१० रुपये असा होता.

– ०३ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,७१० रुपये असा होता.

– ०४ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,१०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९३० रुपये असा होता.

– ०५ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६५,६२० रुपये असा होता.