सोने - चांदीचा भाव

आजचा सोने-चांदीचा भाव : ९ डिसेंबर २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात तेजी कायम असल्याने जळगाव सराफ बाजार पेठेत सलग तीन दिवस सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. आज गुरुवारी या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या भावात किंचित १० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. आज चांदी २१० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोने जवळपास १५० रुपयांनी महागले होते तर चांदी ५७० रुपयाने महागली होती.

आजचा जळगावातील सोने-चांदीचा भाव :

आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,१८० रुपयांवर गेला आहे. तर चांदी ६३,०७० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

६ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९६० रुपये असा होता. ७ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,७१० रुपये इतका नोंदविला गेला. ८डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२८० रुपये इतका नोंदविला गेला. गेल्या तीन दिवसात सोने ६८० रुपयाने महागले आहे. तर चांदी ७२० रुपयाने महागली आहे.

ओमिक्रॉनची भीती वाढल्यास सोने आणि चांदी अधिक महाग
बाजार तज्ज्ञांच्या मते, कोविड ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची भीती वाढल्यास सोने-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. किंबहुना अर्थव्यवस्थेतील दबावाची चिन्हे पाहता गुंतवणूकदार अधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. गेल्या वर्षी कोविडमध्येही असेच दिसून आले होते, जेव्हा भौतिक सोन्याची मागणी नसतानाही गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचल्या होत्या.

सोन्याचा भाव कसा तपासाल?
आपण घर बसल्या सोन्याचे भाव (Know how to check Gold Rates) तपासू शकता. फक्त आपल्याला 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर आपल्या फोनवर मेसेज येईल, ज्यात ताजे भाव तपासता येतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button