जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । देशात सगळ्यात मोठा सण म्हणजेच दिवाळी. आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ग्राहकांची आतापासूनच दिवाळीची तयारी, नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात लगबग सुरु आहे. मात्र त्यापूर्वी सोने आणि चांदीच्या भावात वाढ होताना दिसून येतेय. सलग पाच दिवस सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) वाढ झालेली दिसून येतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर पाच दिवसात सोने जवळपास 2 हजार रुपयांनी महागले आहे. सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 52 रुपयावर गेला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव देखील 61 हजारांवर गेला आहे.
काय आहे MCX वर आजचा सोन्याचा भाव?
MCX वर आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात 11.30 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोने 70 रुपयांनी वाढून 52,040 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव जवळपास 50,100 पर्यंत होता. मात्र त्यात गेल्या काही सत्रात वाढ झालेली दिसून आलीय. गेल्या तीन ते चार दिवसात सोने जवळपास 2000 रुपयांनी महागले असल्याचे दिसून येतेय.
काय आहे MCX वर आजचा चांदीचा भाव?
दरम्यान, दुसरीकडे आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात चांगलीच उसळी आली आहे. आज सकाळच्या सत्रात चांदी प्रति किलो तब्बल 240 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर 61,586 रुपयावर व्यवहार करत आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा भाव 57,500 रुपयापर्यंत होता. मात्र गेल्या तीन ते चार दिवसात चांदी जवळपास 4000 रुपयांनी वधारला आहे.
जळगाव सुवर्णनगरीतही सोने चांदी वधारली?
जळगाव सुवर्णनगरीतही सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून आली. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 52,400 रुपये इतका आहे. सोन्याचा हा दर सोमवारी जवळपास 51,300 ते 51,400 रुपयापर्यंत होते. त्यात आतापर्यंत जवळपास एक हजाराहून अधिकची वाढ आलेली दिसून येतेय. दुसरीकडे सध्या चांदीचा प्रति किलोचा भाव जवळपास 62,000 हजारावर आहे. तसेच सोमवारी चांदीचा दर जवळपास 57,500 इतका होता. मात्र त्यात गेल्या काही दिवसात तब्बल 4000 हजाराहून अधिकची वाढ झालेली दिसून येतेय.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.