⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज ‘इतक्या’ रुपयाने स्वस्त झाले

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । गेल्या महिन्यात उच्चांक स्थरावर गेलेले सोने आणि चांदीचे दर आता पुन्हा निच्चांकी पातळीवर येऊ लागला आहे. गेल्या दोन आठवड्याच्या घसरणीनंतर या चालू आठवड्यात देखील सोने दरात मोठी घसरण झाली आहे. आज गुरुवारी पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोने २०० रुपायांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात ८४० रुपयांची घसरण झाली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने १५० रुपयाने तर २१० रुपायने महागली होती.

आजचा सोने चांदीचा भाव?
आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,८०० रुपये इतका आहे. तर चांदी ६३,११० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. पारंपारिक धारणेनुसार अक्षय्यतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाताे. या दिवशी सोन्याच्या दरात तब्बल ११०० शेहून अधिक घसरण झाली होती. तर चांदी देखील १२०० रुपायांनी स्वस्त झाली होती. यामुळे ग्राहकांनी सराफी पेढ्यांमध्ये गर्दी केली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दिवसभरात शहरातील सुवर्णपेठेत जवळपास २५ किलाे साेन्याची विक्री झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला असून गुढीपाडव्याच्या दुप्पट व्यवसाय झाल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात १३५० ते १४०० रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील ३२५० ते ३३०० रुपयाने स्वस्त झाली आहे. तर या चालू आठवड्यात तीन दिवसात सोने दोन वेळा महागले आहे. तर चांदी दोन वेळा स्वस्त तर एक वेळा महागले आहे. चार दिवसात सोने ७०० ते रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी २००० रुपयांनी घसरली आहे.

या आठवड्यातील दर
सोने
: जळगावमध्ये २ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,९७० रुपये होते. ३ मे रोजी ५१,८५०, ४ मे रोजी ५२,००० तर आज ५१,८०० प्रति तोळा इतका आहे.

चांदी : तर दुसरीकडे २ मे रोजी चांदी दर ६५,०५०, ३ मे ६३,७४०, ४ मे ६३,९५० तर आज ६३,११० प्रति किलो इतका होता.