जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीही स्वस्त झाली आहे. या व्यापार सप्ताहात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 681 रुपयांची घट नोंदवली गेली आहे, तर चांदीच्या दरात 1,844 रुपयांची घट झाली आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस मार्केट बंद असल्याने नवे दर जाहीर होत नाही. Gold Silver Rate Today
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,265 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 54,316 रुपयांवरून 52,472 रुपये प्रति किलोवर आला आहे.
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
29 ऑगस्ट 2022- 51,265 रुपये प्रति 10 ग्रॅम
30 ऑगस्ट 2022- 51,188 रुपये प्रति 10 ग्रॅम
31 ऑगस्ट 2022 – मार्केट हॉलिडे
01 सप्टेंबर 2022- 50,409 रुपये प्रति 10 ग्रॅम
02 सप्टेंबर 2022- 50,584 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
29 ऑगस्ट 2022- रुपये 54,316 प्रति किलो
30 ऑगस्ट 2022- रुपये 54,350 प्रति किलो
31 ऑगस्ट 2022 – मार्केट हॉलिडे
01 सप्टेंबर 2022- रुपये 52,022 प्रति किलो
02 सप्टेंबर 2022- रुपये 52,472 प्रति किलो
जळगावातले दर :
जळगावातमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,990 इतका आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 51,300 रुपायांवर आला.तर दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव 55,600 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)