जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । आज म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याच्या स्पॉट किंमतीत सुमारे 2 टक्के आणि चांदीच्या दरात 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र भारतीय वायदे बाजारातील जागतिक तेजीचा सोन्याच्या किमतीवर परिणाम झालेला नाही. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीवर परिणाम झालेला दिसून आला आहे. आज सोने स्वस्त तर चांदी पुन्हा महागली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा आजचा भाव?
देशभरात उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणत दागिने खरेदी केली जाते. अशातच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज मंगळवारी किंचित 35 रुपयांनी घसरले आहे. मात्र तर दुसरीकडे चांदी 470 रुपयांनी महागली आहे. यापूर्वी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात सोने जवळपास 70 रुपयांनी घसरले होते. तर चांदी 542 रुपयांनी महागली होती. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सकाळी 11 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 50,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर झाला. तर चांदी 61,452 रुपये प्रति किलो इतका आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील सोने चांदी भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 47,082 रुपये इतका आहे. तो पूर्वी 46,990 रुपये इतका होता. तर सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 51,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तो यापूर्वी 51,300 रुपये प्रति तोळा इतका होता. तसेच चांदी 57,500 प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत 1.90 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चांदीने 8.46 टक्क्यांनी झेप घेतली आहे. आज सोन्याची स्पॉट किंमत $1,695.92 प्रति औंस झाली आहे. काल म्हणजेच सोमवार 3 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 0.10 टक्क्यांनी वाढला. शुक्रवारी ते 0.12 टक्क्यांनी वाढले होते. चांदीचा भावही आज ८.४६ टक्क्यांनी वाढून २०.७२ डॉलर प्रति औंस झाला आहे.