Gold Silver : आजचा सोने-चांदीचा भाव, ४ डिसेंबर २०२१

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । जगात भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोनाचा नव्या ‘ओमिक्रॉन’ भारतात दाखल झाला असून दोन रुग्ण आढळून आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा अनिश्चित संकटात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. जळगाव सराफ बाजारात आज शनिवारी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४८ हजार ३२० रुपये इतकी आहे. तर चांदीचा ६२ हजार ०७० रुपये प्रति किलो इतका आहे.

कोरोनाचा नव्या ‘ओमिक्रॉन’मुळे जागतिक बाजार पेठेत सोने आणि चांदीच्या भावात हालचाल दिसून आलीय. जळगाव सराफ बाजार पेठेत या आठवड्यात किंचित १९० रुपयाची घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. चांदीचा २०७० रुपयाची घसरण झालेली आहे. काल आठवड्यच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोने ३७० रुपयाने स्वस्त झालं होत; तर चांदी प्रति किलो ८३० रुपयाने स्वस्त झाली होती.

आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटमुळे ओमिक्राॅनचा जगभरात दहशत पसरली आहे. बड्या देशांनी ओमिक्राॅनचा फैलाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची तयारी सुरु केली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे. असं असलं तरी सोने आणि चांदीच्या भावात किंचित चढ-उतार दिसून येत आहे.

सुरुवातीच्या कोरोना महामारीच्या काळात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला होता. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यानं भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आली होती. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमतीनं 56 हजाराचा टप्पा गाठला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळालं. सोन्याचे दर आता 48 हजार रुपयांवर आलं आले.

या आठवड्यातील असे होते दर?

२९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५०० रुपये असा होता. ३० नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०८० रुपये असा होता. १ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०९० रुपये इतका आहे. २ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९०० रुपये इतका आहे. ३ नोव्हेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०७० रुपये इतका आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखतात?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येतं. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असतं. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात. सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळं त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का? याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -