खुशखबर! तीन दिवसांत सोनं 1000 रुपयांनी तर चांदी 1200 रुपयांनी झाली स्वस्त

सप्टेंबर 30, 2023 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२३ । मागणीत वाढ होत असल्याच्या कारणामुळे लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात मोठी झेप घेतली जाते. मात्र सध्या लग्नसराईचे दिवस नसले तरी सणासुदीच्या दिवसाला सुरुवात झाली असून या काळात दोन्ही धातूंना मागणी असल्याने भाव वाढीची शक्यता आहे. पण सध्या भारतीय सराफा बाजारात या दोन्ही धातूंच्या किमती सातत्याने घसरत आहेत. Gold Silver Rate Today

gold silver 2 jpg webp

अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असतील, तर चुकूनही ही संधी सोडू नका कारण येणाऱ्या काळात सोने-चांदी महाग होऊ शकतात. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत सोने 1000 रुपयांनी तर चांदी 1200 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सध्या भारतीय सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर चांदीचा भाव 69,900 रुपये प्रति किलोवर आला आहे. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोने 57,096 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला आहे. तर चांदी 69,870 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
या आठवड्यात जळगावच्या सुवर्णनगरीतही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून येतंय. गेल्या तीन दिवसापूर्वी म्हणजेच 27 सप्टेंबरला जळगावात 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 59,400 रुपयावर होता. तर चांदीचा प्रति किलोचा दर 72000 हजारावर होता.

सध्या आता 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 58,400 रुपयावर विकला जात आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर 70000 हजारावर आला आहे. म्हणजेच गेल्या तीन सत्रात सोन्याचा दर तब्बल 1000 रुपयांनी घसरला आहे. तर चांदीचा दर 2000 रुपयांनी घसरलेला दिसून येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now