⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

खुशखबर…सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.  जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आपण जर आज सोने खरेदी केले तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. आज (३०सप्टेंबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर २८० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी २१३० रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. त्यापूर्वी काल प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर २२० रुपयाने तर चांदी १८० रुपये प्रति किलोने कमी झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आज (३० सप्टेंबर) जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४६,६५० रुपये इतका आहे.  तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ५९,७५० रुपये इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याने प्रतितोळा ५६,२०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या तुलनेत सोने सध्या ९,५५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे.

२७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत असे होते सोने दर?

सोमवारी (२७ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,०७० होते, त्यात ७० रुपयाची किरकोळ घसरण झाली होती. मंगळावारी (२८ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४६,९३० इतका होता. त्यात काल २२० रुपयाची घसरण झाली होती. व आज गुरुवारी (३० सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४६,६५० रुपये इतका आहे. गेल्या चार दिवसात सोने ३ वेळा स्वस्त तर एक वेळा महागले आहे. ४ दिवसात सोने ५७० रुपयाने स्वस्त झालं आहे. व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे मागील काही दिवसापासून चांदीच्या भावात मोठी हालचाली दिसून येत आहे. गेल्या चार दिवसात मोठी घसरण झाली आहे. चांदी ३ हजार १३० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.