⁠ 
रविवार, मे 19, 2024

सोने-चांदी महागली ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था हळुहळू रुळावर येत आहे. सणासुदीच्या हंगामात सराफांनी सोने खरेदीवर भर दिल्याने कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराचा दिवस असलेल्या सोमवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम  ३१० रुपयाने महागले आहे. तर चांदी प्रति किलो ८९० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी मागील गेल्या दोन दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात किंचित वाढ नोंदविली गेलीय.

सोने अजून विक्रमी पातळीच्या तुलनेत ७५०० रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव ५६२०० रुपयांपर्यंत वाढला होता. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चांदीचा भाव ७७८४० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. त्यात जवळपास १३००० रुपयांची घसरण झाली आहे.

या महिण्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात १ ऑगस्ट २०२१ ला सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ४९,४१० इतका होता. त्यात आतापर्यंत ७०० ते ८०० रुपयापर्यंतची घसरण झालीय. तर चांदीचा भाव प्रति १ किलो ६९,८०० इतका होता. त्यात मोठी घट होऊन चांदी ४७०० रुपयापर्यत स्वस्त झालीय.

दरम्यान, जगाच्या अर्थव्यवस्थेत येणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमती कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८६५ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,६५० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६५,०८० रुपये इतका आहे.