खुशखबर…! सलग चौथ्या दिवशी सोनं झालं स्वस्त ; वाचा आजचे नवे दर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । डॉलरमधील कमकुवतपणामुळे सराफा बाजारात तेजी दिसून येत आहे. सोने आज पुन्हा स्वस्त झाले आहे. या मौल्यवान धातूची सलग ४ दिवस घसरण सुरू आहे. आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सोनं ८० ते १०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात २३० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूवी काल सोने स्वस्त तर चांदी महागली होती. काल चांदी प्रति किलो दरात ६७० रुपयाने महागली होती.

देशांतर्गत बाजारात गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर कमी होतानाचे दिसून येत आहे.  जळगाव सराफ बाजारात गेल्या चार दिवसाच्या घसरणीनंतर सोने ५६० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात मोठा बदल झालेला दिसून येतोय. गेल्या चार दिवसात चांदी ३ वेळा स्वस्त झाली. त्यात ९२० रुपयाने स्वस्त झाली आहे. तर काल गुरुवारी चांदीत ६७० रुपयाची वाढ झाली होती.

३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत सोने असे होते दर?

३० ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत ३१० रुपयाची वाढ झाली होती,
३१ ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत ३८० रुपयाने स्वस्त झाले होते.
१ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत ५० रुपयांनी कमी झाली होती.
२ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत ५० रुपयांनी कमी झाली होती
तर आज ३ सप्टेंबर रोजी सोन्याच्या भावात ८० ते १०० रुपयाची घसरण झाली आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ८ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८०९रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,०९० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,८३० रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -