⁠ 
शनिवार, मे 4, 2024

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही घसरली, वाचा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जागतिक बाजारातील पडझडीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणूक वाढवली आहे. यामुळे सोने-चांदी दरात सध्या मोठी तेजी आहे. वाढत्या दरांमुळे सोन्याचा भाव 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदी देखील स्वस्त झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात सकाळच्या सत्रात सोने ५३० स्वस्त झाले आहे. तर चांदी किरकोळ ४० रुपयाने घसरली आहे. त्यापूर्वी काल बुधवारी सोने तब्बल १६३० रुपयाने तर चांदीच्या दरात ३०५० रुपयाने महागली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,५०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६८,५३० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,४००, बुधवारी ५३,०३०, तर आज गुरुवारी ५२,५०० रुपये इतका आहे. दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,५२० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,५२०, बुधवारी ६८,५७०, गुरुवारी ६८,५३० रुपये प्रति किलो इतका होता.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.