---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

जळगावकरांना 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी इतके पैसे मोजावे लागताय, पहा कुठे पोहोचले दर?..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२३ । सोने आणि चांदीचे दर दररोज बदलत असतात. गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठल्यानंतर मध्यंतरी घसरण झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र सोन्याचा दर 60 हजाराच्या खाली आलेला नाही. अद्यापही सोन्याचा दर 61 हजाराच्या उंबरवठ्यार आहे. Gold Silver Price Today

gold silver 1 jpg webp webp

दुसरीकडे चांदीची किंमत 77 हजारावरून 71 हजारांवर आली होती. परंतु गेल्या तीन चार दिवसात किमतीत वाढ आल्याने चांदीच्या किमतीने 73 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

---Advertisement---

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या..

जळगावात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,800 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅम इतका आहे. गेल्या चार पाच दिवसात सोन्याचा किमतीत 400 ते 500 रुपयापर्यंतची वाढ झालेली दिसून येतेय. यापूर्वी मंगळवारी सोन्याचा दर 60, 400 रुपयावर (विनाजीएसटी) होता.

दुसरीकडे 31 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदीची किंमत 71000 रुपये (विनाजीएसटी) प्रति किलो इतकी होती. सध्या चांदीचा दर 73,200 रुपये (विनाजीएसटी) प्रति किलोने विकली जात आहे. म्हणजेच गेल्या तीन चार दिवसात चांदीचा दर तब्बल 2200 ते 2400 रुपयांनी वधारला आहे.

BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा..अलर्ट जारी

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---