⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | राष्ट्रीय | ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर ; 900 हुन अधिक जखमी

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर ; 900 हुन अधिक जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । ओडिशातील बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 900 लोक जखमी झाले आहेत. हा आकडा वाढत आहे.

ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

भारतीय रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ट्रेन क्रमांक १२८४१ चेन्नई सेंट्रल ते शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ती शालिमारकडे निघाली. खरगपूर विभागातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर मालगाडीला धडकले, त्यामुळे मालगाडीही अपघाताच्या कचाट्यात आली.

अपघात झाला तेव्हा या अपघातात 50 ते 70 लोक दगावल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा 120 वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही 350 वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा 233 आणि जखमींचा आकडा 900 झाला आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सध्या अप आणि डाऊन अशा दोन्ही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. येथे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ओडिशा सरकार मदतीसाठी जनरेटर आणि दिवे घेऊन अपघातस्थळी पोहोचले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.