सोनं-चांदी स्वस्त! महिन्याभरात किमतीत झाली ‘एवढी’ घसरण..

जून 1, 2023 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली होती. मात्र त्यांनतर पंधरवाडामध्ये घसरण पाहायला मिळाली. जून महिन्यातही सोने आणि चांदीचा दर उसळी घेणार का? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. मात्र आज जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या कितमीत घसरण झालेली दिसून येतेय. Gold Silver Rate 1 June 2023

gold silver jpg webp

आज गुरुवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा दर 284 रुपयांनी घसरून 59,879 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत 354 घसरण झाली आहे. यामुळे एक किलोचा दर 71,748 रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील सोन्याचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. दरम्यान, 1 मे 2023 रोजी सोन्याचा दर 60,600 रुपये प्रति तोळा इतका होता. एकंदरीत महिन्याभरात सोन्याच्या किमतीत मोठी चढ-उतार दिसून आलीय. यापूर्वी 5 मे 2023 रोजी सोन्याच्या दराने सार्वकालीन उच्चांकी दर गाठला होता. त्यादिवशी सोने 62000 हजार रुपयावर गेले होते. उच्चांकीपासून सोने अद्यापही 1200 ते 1400 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे.

चांदीचा दर
जळगावात सध्या चांदीचा दर 71,500 रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. दरम्यान, गेल्या महिन्याचं पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मे 2023 रोजी चांदीचा दर 75,000 रुपयावर होता. 5 मे रोजी चांदीच्या किमतीने 77000 रुपयाचा टप्पा ओलांडला होता. त्यात आतापर्यंत मोठी घसरण झालेली दिसून येत आहे. उच्चांकीपासून चांदी 5500 ते 6000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

वरील सोन्या-चांदीच्या किमतीवर जीएसटी आणि दागिने बनवण्याचे शुल्क लागू नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now