Gold Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ, खरेदीला जाण्यापूर्वी तपास आजचे दर

जून 3, 2022 10:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संमिश्र संकेतांमुळे सलग दोन दिवस सोन्याच्या (Gold Rate) भावात घसरण दिसून आली. मात्र आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीला ब्रेक लागला असून सोने आणि चांदीच्या (Silver Rate) भावात वाढ झाली आहे. आज शुक्रवारी जळगावात सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८० रुपयाने वधारला आहे. सोबतच चांदी तब्बल ७८० रुपयांनी महागली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने ७० रुपयांनी घसरले होते तर चांदी ४६० रुपयांनी महागली होती.

gold silver rate 3

जळगावातील सोने-चांदीचा भाव? Gold Silver Price
आज जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५२,४६० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,८०० रुपयावर आला आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत पहायला मिळते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे. या आठवड्यात सोने दोन वेळा महाग तर दोन वेळा स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदी ३ वेळा महाग तर दोन वेळा स्वस्त झाली आहे. या आठवड्यात सोने ३०० ते ३२५ रुपयांनी महागले आहे. चांदी देखील ३०० रुपयांपर्यंत महागली आहे.

वर्षी मार्चमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होउन ते ५५ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रामपर्यंत पोहचले होते. तर चांदी तब्बल ७३ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. मात्र तीन महिन्यात सोन्याचे दर जवळपास ३२०० ते ३४०० हजाराहून अधिकने घसरले आहे. तर चांदीचा सध्याचा दर देखील त्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे ९ हजार रुपयांहून अधिकने घसरली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
३० मे २०२२- रुपये ५२,११० प्रति १० ग्रॅम
३१ मे २०२२ – रुपये ५२,११० प्रति १० ग्रॅम
१ जून २०२२ – रु ५२,०५० प्रति १० ग्रॅम
२ जून २०२२ – रु ५१,९८० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
३० मे २०२२- रुपये ६३,५७० प्रति किलो
३१ मे २०२२ – रुपये ६३,३३० प्रति किलो
१ जून मे २०२२- रुपये ६२,५६० प्रति किलो
२ जून मे २०२२- रुपये ६३,०२० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now