४८ हजारांपेक्षा कमी झाले सोन्याचे भाव : वाचा आजचे सोने-चांदीचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून येत आहे. काल (२८ संप्टेंबर) सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले होत. परंतु आज दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली आहे. आज (२९ सप्टेंबर) ला प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर २२० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी १८० रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. त्यापूर्वी काल मंगळवारी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८० रुपयाची तर चांदी प्रति किलो ७०० रुपयाने महागली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आज (२९ सप्टेंबर) जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४६,९३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रमचा दर ४४,३८० इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१, ८८० रुपये इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६२०० वर गेला होता. परंतु त्यात घसरण होऊन आता सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,१४० रुपयांपर्यंत आला आहे.

सोने उच्चांकी पातळीपेक्षा 9270 रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याने प्रतितोळा 56200 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या तुलनेत सोने सध्या 9270 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे.

सध्या सोने सप्टेंबर महिन्यातील जवळपास निचांकी पातळीवर आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज