जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२५ । सोने आणि चांदी दरात चढ-उतार सुरु असून गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने वाढलेले सोन्याचे दर आता हळूहळू खाली येताना दिसत आहेत. आज, मंगळवार २९ जुलै २०२५ रोजी, सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे

सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ११० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे २४ कॅरेट १ तोळं सोन्याचा दर आता ९९,८२० रुपयावर आला आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोनं खरेदीसाठी ९१,५०० रूपये मोजावे लागतील. तर, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. १ किलो चांदीचा दर १,१६,००० इतका आहे.

सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमती वेगाने वाढत होत्या. या वाढीमागे जागतिक अस्थिरता हे कारण असल्याचे मानले जात होते. तसेच सोनं हा केवळ गुंतवणुकीचा पर्याय नसून सण-उत्सव, विवाहसोहळे आणि धार्मिक विधींमध्ये महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत होणारे चढ-उतार हे सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम करतात.










