जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । सलग तीन दिवस सोन्याच्या भावात घसरण झाली होती. मात्र या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज गुरुवारी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोबतच चांदी देखील मोठ्या किमतीने महागली आहे. आज दुपारी सोन्याच्या भावात ३३० रुपयाची तर चांदी ७५० रुपयाची वाढ झाली आहे. Gold Silver Rate Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, गुरुवारी सोन्याचा भाव वाढून ५१,७७८ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आले. तर चांदीचा एक किलोचा भाव ५५,६९० रुपयांवर आले आहे. दरम्यान,उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
इंडिया बुलियन असोसिएशननुसार, २३ कॅरेट सोन्याचा दर ५१,७५० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा दर ७४,५९४ रुपये प्रति १० ग्रॅम, २० कॅरेट सोन्याचा दर ३८,९७९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि १० कॅरेट सोन्याचा भाव ३०,३९५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. साधारणपणे लोक २२ कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करतात, त्याचा दर 47594 रुपये आहे.
जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आजच्या वाढीनंतर जळगावमध्ये सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ५२,५०० रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव ५६,९०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात साेने ५०० रुपयांनी तर चांदी ३२५० रुपये घसरली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)