⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२२ । सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच आहे. कालच्या दरवाढीनंतर आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात २९० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी ६७० रुपयांनी स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने २२० रुपयाने तर चांदी ४८० रुपयाने महागली होती.

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव? Gold Silver Rate
आज बुधवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,५८० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,२८० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया आणि युक्रेन युद्धाची धग अद्याप कायम आहे. त्यातच चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं आहे. ज्यामुळे सोने तेजीत असल्याचे कमाॅडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

जळगाव सराफ बाजारात या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही धातूंमध्ये वाढ झाली होती. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. या महिन्याच्या ९ मार्च रोजी सोने ५५ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर गेले होते. गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये ५६ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. त्यानंतर या महिन्यात सोन्याने पुन्हा उच्चांक गाठला होता.

मात्र त्यानंतर आता दोन्ही धातूंचे दर घसरू लागले. गेल्या आठवड्यात सोने दरात जवळपास १७०० ते १८०० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात जवळपास २१०० रुपयाची घसरण झाली.

या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २१ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,६५० रुपये होते. तर २२ मार्च रोजी ५२,८७० तर आज २३ मार्च रोजी ५२,५८० इतका आहे. तर दुसरीकडे २१ मार्च ला चांदी ६९,४७० प्रति किलो होती. २२ मार्च ६९,९५० तर आज ६९,२८० रुपये इतका आहे.