⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सोने-चांदीच्या भावात घसरण ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किंमती वाढत आहे. दरम्यान, आज शुक्रवारी सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. आज सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ९० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी प्रति किलो ६०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात २२० रुपयाची तर चांदीच्या भावात ११८० रुपयाची वाढ झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आजच्या घसरणीनंतर जळगाव सराफ बाजारात आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५२० रुपयाने इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,५४० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते

ऐन सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव चांगलाच वधारेल, असे म्हटले जात आहे. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते १२ ते १४ हजार प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

या महिन्याच्या १ ऑक्टोबरला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७४१० रुपये इतका होता. तर चांदीचा प्रति किलो ६१ हजार रुपये इतका होता. म्हणजेच २१ दिवसात सोन्याच्या भावात जवळपास १ हजार रुपयाची वाढ झाली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात जवळपास ५५०० रुपयाची वाढ झाली.

गेल्या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (१८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० होते, त्यात ७२० रुपयाची घसरण झाली होती. मंगळावारी (१९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,४०० इतका होता. त्यात किरकोळ ८० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२० ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३९० रुपये इतका आहे. त्यामध्ये १० रुपयाची किंचित घट झाली होती. गुरुवार (२१ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६१० रुपयाने इतका आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.