fbpx

आज सोने स्वस्त तर चांदी झाली महाग ; वाचा प्रति तोळ्याचा भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । देशांतर्गत शेअर बाजारात सतत तेजीमुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. आज गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली. आज जळगाव सराफ बाजारात सोनं ५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे चांदी मात्र महागली आहे. आज चांदीच्या प्रति किलो दरात ६७० रुपयाची वाढ झालीय.

त्यापूर्वी काल जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली होती. सोने ५० तर चांदी ११० रुपयाने स्वस्त झाली होती. देशांतर्गत शेअर बाजारात सतत तेजी आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर कमी होतानाचे दिसून येत आहे. तर चांदीच्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ८ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८१७ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,१७० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६५,०६० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt