fbpx

आजचा सोने-चांदीचा भाव : ०२ ऑक्टोबर २०२२१

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ ।  गेल्या काही दिवसांपासून उतरणीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोन्याच्या दरांमुळे सर्वांचेच लक्ष सराफा बाजाराकडे लागले होते. त्यातच काल शुक्रवारी जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली. काल (१ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ७६० रुपयाने तर चांदी १२६० रुपये प्रति किलोने महागली होती.

सध्या जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,४१० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१,०१० रुपये इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जळगाव सराफ बाजारपेठेत देखील सोने आणि चांदीच्या भाव एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होतानाचे दिसून आले. या आठवड्यात सोन्याचे तीन वेळा स्वस्त तर दोन वेळा महागले आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात काहीसी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात घट झाल्याचे दिसून आले. सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे ग्राहक सोने-चांदीसारख्या मौल्यवान वस्तू या काळात खरेदी करणे टाळतात. त्यामुळे साहजिकच या पंधरा दिवसात सराफा बाजार मंदावलेला असतो.

दरम्यान, अमेरिकेची अर्थविषयक माहिती आणि महागाईची चिंता सोन्याच्या किंमतीवर प्रभाव पाडेल असे या तज्ज्ञांचे मत आहे. शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाली तर गुंतवणूकदार सोन्यात आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतील असे मत आहे.

सप्टेंबर महिन्यात सोने-चांदीच्या भावात झाली घसरण 

सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या भावात किंचित घसरण झाल्याचे दिसून येतेय. १ सप्टेंबरला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,२२० रुपये इतका होता तो आता १ ऑक्टोबर रोजी प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,४१० रुपये इतका आहे. तर सप्टेंबर महिन्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येतेय. मागील महिन्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येतंय. १ सप्टेंबरला चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,३९० रुपये इतका भाव होता. तो आज ६१,०१० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज