सोनं पुन्हा महागलं : तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 7800 रुपयांनी स्वस्त, वाचा नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी सोने पुन्हा महागले आहे. आज मंगळवारी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे, तर चांदीचा भाव आज स्थिर आहे. आज प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८० रुपयाची घसरण झाली. त्यापूर्वी काल सोमवारी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७२० रुपयाची घसरण झाली होती तर चांदीच्या भावात ३९० रुपयाची वाढ झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव

जळगाव सराफ बाजारात आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,४०० रुपयाने इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,७५० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते

सराफ बाजारात गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीचे भाव एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत असल्याचे दिसून आले. नवरात्रीत तर  सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव कमी होती अशी अपेक्षा होती. परंतु भाव वाढीने सोने ४९ हजार रुपये प्रति तोळ्यावर जाऊन पोहोचले होते.

१ ऑक्टोबर २०२१ ला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,४१० रुपये इतका होता. त्यात आतापर्यंत १००० रुपयाची वाढ झाली आहे. १ ऑक्टोबरला चांदीचा प्रति किलोचा भाव ६१,०१० रुपये इतका होता. त्यात आतापर्यंत ३७०० रुपयाची वाढ झाली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून या काळात लोक दागिने खरेदी करणे पसंद करतात. परंतु ऐन सणासुदीत सोने आणि चांदीने भाव वाढले आहे. पुढील महिण्यात दिवाळी आहे. या दरम्यान तरी सोने चांदी दर कमी होतील का? याकडे खरेदीदारांच्या नजरा लागून आहे.

दरम्यान, गेल्या दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी तसेच लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर सोने ५१ हजार २०० रुपये प्रति तोळा (3 टक्के जीएसटी वगळून) तर चांदीचे दर ६४ हजार ५०० रुपये प्रतिकिलो (3 टक्के जीएसटी वगळून) असे होते. त्यामानाने यंदा (आजच्या नुसार) सोने २८०० रुपयाने स्वस्त झाले आहे आहे.

गेल्या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (११ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,१४० होते, त्यात २२० रुपयाची वाढ झाली होती. मंगळावारी (१२ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,१५० इतका होता. त्यात किरकोळ १० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (१३ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३०० रुपये इतका आहे. त्यामध्ये १५० रुपयाची वाढ झाली होती. गुरुवार (१४ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४९,०४० रुपये इतका आहे. त्यात ७४० रुपयाची मोठी वाढ झाली होती.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज