fbpx

आजचा सोनं आणि चांदीचा भाव : १९ ऑगस्ट २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र, या चालू आठवड्यात सोने आणि चांदी दर पुन्हा महाग होऊ लागले आहे. गेल्या आठवड्यात सोने दर ४८ हजाराच्या घरात होते ते आता ४९ हजाराच्या वर आले आहे.

गेल्या तीन दिवसात जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर तब्बल ९४० रुपयाने महागले आहे. तर चांदी १६३० रुपयाने महागले आहे. दरम्यान, आज सोने आणि चांदी दरात कोणताही बदल झालेला नाहीय.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज सोने प्रती दहा ग्रॅम ५९० रुपयाने वाढले आहे. तर चांदी आज प्रती किलो १४१० रुपयाने महागली आहे.

कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोने चांदीचे भाव वेगाने बदलत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भावात वाढ होत आहे.

सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत आठ ते साडेआठ हजार रुपयांनी स्वस्त आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.

एरव्ही जुलै-ऑगस्टचा हंगाम सराफ बाजारासाठी मंदीचा काळ असतो. पण आता दर कमी झाल्याने अनेक जण गुंतवणूक म्हणून तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येणाऱ्या लग्नसराईसाठी सोने खरेदी करत आहेत.

जळगावच्या सुवर्ण बाजारात या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति १० ग्रॅम दर ४९,४१० इतका होता. त्यात आता जवळपास १००० ते ११००  रुपयापर्यंत घसरण झाली आहे. गेल्या वर्षापासून मोठी भाववाढ होऊन सोन्यापेक्षाही अधिक भाव झालेल्या चांदीच्या भावात अचानक मध्येच मोठी घसरण तर कधी मोठी भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १ ऑगस्टला चांदीच्या प्रति १ किलोचा ६९,८०० रुपये इतका होता. तो आता ५०६० रुपयापर्यंत घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८३९ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,३९० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,७१० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज