Gold Silver Price : सलग तिसऱ्या दिवशी चांदी वाधरली, सोने झाले स्वस्त ; वाचा आजचा भाव

मे 18, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । सध्या सोन्याच्या (Gold Rate) दरात चढ-उतार होत असल्याचे दिसून येतेय. कालच्या दरवाढीनंतर आज बुधवारी सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली आहे. तर दुसरीकडे मात्र, चांदी (Silver Rate) सलग तिसऱ्या दिवशी महागली आहे. आज बुधवारी जळगाव सुवर्ण नगरीत १० ग्रॅम सोन्याचे दर ८० रुपयांनी घसरले आहे. तर चांदी प्रति किलो २४० रुपयांनी महागली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ३९० रुपयांनी तर चांदी तब्बल १६३० रुपयांनी महागली होती. त्यामुळे चांदीचा भाव पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागला आहे.

gold silver rate 1

जळगावातील आजचा सोने चांदीचा भाव? Gold Silver Rate Today
आज बुधवारी सोने प्रतीताेळा ५१,३५० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६२,५९० रुपयांवर पोहोचले आहेत.दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

मागील दोन ते तीन आठवड्यापासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण दिसून आली. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विवाह समारंभात सोन्याला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या देशात सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र तरी देखील सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून स्वस्त होत असल्याचे पहायला मिळत आहेत.

गेल्या महिन्यापूर्वी ५४ हजार रुपयांवर असलेला सोन्याच्या भाव सध्या ५१ हजारांवर आला आहे. म्हणजेच गेल्या महिन्याभरात सोने जवळपास ३ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या बाबतीत गेल्या महिन्यापूर्वी चांदीचा भाव ७० हजार रुपयांवर होता. तो आता ६२ हजारांवर गेला आहे. महिन्याभरात चांदी तब्बल ७ ते ८ हजार रुपयाने स्वस्त झाली आहे.

गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात सोने जवळपास ७०० ते ७५० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात जवळपास ३६०० ते ३७०० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६० हजाराच्या घरात आली होती. मात्र गेल्या तीन दिवसापासून चांदीच्या भाव वाढत असल्याने चांदी पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागली आहे. तीन दिवसात चांदी २४५० ते २५०० रुपायांनी महागले आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१६ मे २०२२- रुपये ५१,०४० प्रति १० ग्रॅम
१७ मे २०२२ – रुपये ५१,४३० प्रति १० ग्रॅम१७
१८ मे २०२२ – रु ५१,३५० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१६ मे २०२२- रुपये ६०,७२० प्रति किलो
१७ मे २०२२ – रुपये ६२,३५० प्रति किलो
१८ मे २०२२- रुपये ६२,५९० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now