⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

स्वस्तात खरेदीची संधी चुकवू नका ; आठवड्याभरात जळगावात सोने 1 हजार रुपयांपेक्षा अधिकने घसरले

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । देशभरातील हिंदू धर्मातील सनातन संस्कृतीत पितृ पक्षाचा 16 दिवसांचा पंधरवडा सुरू असून त्याचा परिणाम देशातील प्रत्येक व्यवसायावर होताना दिसत आहे. पितृ पक्षातील काही व्यवसायांवर थेट परिणाम झाला आहे. पण त्याचा सर्वाधिक परिणाम सोन्या-चांदीवर (Gold Silver Price) झाला आहे. मागील काही दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याभरात जळगावात सोने 1 हजार रुपयांहून अधिकने घसरले आहे. मात्र दुसरीकडे चांदी वधारलेली दिसून येतेय. Gold Silver Rate Today

MCX वर काय आहे भाव?
MCX वर 24 कॅरेट सोन्याचा भाव 49,343 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 56,729 रुपये इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील दर
मागील काही सत्रात झालेल्या घसरणीमुळे जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. मात्र दुसरीकडे चांदी महागलेली दिसून येतेय. सध्या जळगावमध्ये सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 45,980 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,200 रुपये इतका आहे. यापूर्वी व्यवहाराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोने सोमवारी सोने 51,400 तर मंगळवारी 51,150 रुपये तर बुधवारी 51,200 रुपये, गुरुवारी 50800 व शुक्रवारी 50,650 इतका होता. म्हणजेच या व्यापार सप्ताहात  सोने जवळपास 1100 ते 1200 रुपयांनी घसरलेले दिसून येतेय.

चांदी मात्र वधारलेली?
जळगाव सुवर्णनगरीत मात्र चांदीचा भाव वधारलेला दिसून येतोय. सध्या जळगावमध्ये चांदीचा प्रति किलोचा दर 57,000 रुपये इतका आहे. यापूर्वी यापूर्वी व्यवहाराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 56,500, मंगळवारी, 56,800, बुधवारी, 57,800, गुरुवारी 57,000 व शुक्रवारी 57,600 रुपये असा होता. म्हणजेच या व्यापार सप्ताहात चांदी 500 रुपयांनी महागलेली दिसून येतेय.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.