⁠ 
सोमवार, मे 6, 2024

आज सोने महाग,तर चांदी स्वस्त ; पाहा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । जागतिक संकेत आणि रुपयामधील कमकुवतपणामुळे आज देशांतर्गत बाजारात सोने महाग झाले. काल जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. परंतु आज मंगळवारी सोने दरात पुन्हा वाढ झालीय. तर दुसरीकडे चांदी मात्र, स्वस्त झाली आहे.

आज जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ११० रुपयाने महागले आहे. तर चांदी प्रति किलो ३०० रुपयाने स्वस्त झालं आहे. त्यापूर्वी काल सोने २४० रुपयाने तर चांदी प्रति किलो ६१० रुपयाने स्वस्त झालं होत. मागील काही दिवसापासून सोन्या आणि चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होतानाचे दिसून आलेय.

८सप्टेंबर ते ३ सप्टेंबरपर्यंत सोने असे होते दर?

८ सप्टेंबर रोजी सोन्याचा दर ५०० रुपयाने घसरला होता.
९ सप्टेंबर रोजी सोन्याचा दर १०० रुपयाने महागला होता.
१० ते १२ सप्टेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल नाही.

१३ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत २४० रुपयांनी कमी झाली होती
तर आज १४ सप्टेंबर रोजी सोन्याच्या भावात ११० रुपयाची वाढ झाली आहे.

अशी तपासा सोन्याची शुद्धता –

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. ‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७०१ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,०१० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,७८० रुपये इतका आहे.