⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, वाचा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । रशिया-युक्रेनमधील तणाव काही अंशी निवाळल्याने देशांतर्गत सोने-चांदीच्या (Gold Silver Rate) किंमती काहीश्या घसरू लागल्या आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या ३७० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात १०० रुपयाची घसरण झाली आहे.

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आज शुक्रवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,१२० रुपये इतका आहे. तर चांदी ७२,०२० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया-युक्रेन संकटामुळे (Russia-Ukraine Crisis) सोने १९ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर अर्थात ५५,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले होते. यापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२२ मध्ये सोने ५६,२०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत वधारले होते. तर चांदी ७७ हजारांवर गेली होती. मात्र त्यानंतर हळूहळू सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत गेली. गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने १५०० रुपयांनी महागले आहे. तर चांदी २६०० रुपायांनी महागली.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५३,७९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५४,७७०, बुधवारी ५५,५००, गुरुवारी ५३,९८०, शुक्रवार ५४,४९० इतका आहे. तर दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ७०,७८० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ७१,६१०, बुधवारी ७३,०६०, गुरुवारी ७१,२१०, शुक्रवार ७२,१२० प्रति किलो इतका होता.