आजचा सोने आणि चांदीचा भाव : १४ ऑगस्ट २०२१

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे.

मागील गेल्या दोन आठवड्यापासून सुवर्णबाजारात सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट दरावरून खाली-वर होताना दिसून आले. जळगाव सराफ बाजारात सोन्याचा एक तोळ्याचा भाव ४७ हजारावर गेला आहे. तर चांदी ६४ हजार रुपये प्रतिकिलोच्या घरात आली आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या ५ दिवसात सोने ३ वेळा स्वस्त झाले तर दोन वेळा महागले. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने प्रति १० ग्रॅम ३० ते ५० रुपयाने तर चांदी ९३० रुपयाने स्वस्त झाली होती.

सणासुदीचा हंगाम जसजसा जवळ आला आहे, तसतसे सोन्याच्या मागणीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. लोक गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून सोने आणि चांदीच्या खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे सध्या हंगाम नसतानाही सराफ बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सुवर्णनगरी असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात देखील सोने व चांदी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे

सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत तब्बल ९००० रुपयांनी स्वस्त आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.

एरव्ही जुलै-ऑगस्टचा हंगाम सराफ बाजारासाठी मंदीचा काळ असतो. पण आता दर कमी झाल्याने अनेक जण गुंतवणूक म्हणून तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येणाऱ्या लग्नसराईसाठी सोने खरेदी करत आहेत. कोरोना महामारी नियंत्रणात असल्याने बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. त्यामुळे सराफ बाजारात एरवी होणाऱ्या उलढालीच्या तुलनेत 40 ते 50 टक्क्यांनी उलाढाल वाढली आहे.

जळगावच्या सुवर्ण बाजारात या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति १० ग्रॅम दर ४९,४१० इतका होता. त्यात आता जवळपास २००० हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे. गेल्या वर्षापासून मोठी भाववाढ होऊन सोन्यापेक्षाही अधिक भाव झालेल्या चांदीच्या भावात अचानक मध्येच मोठी घसरण तर कधी मोठी भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १ ऑगस्टला चांदीच्या प्रति १ किलोचा ६९,८०० रुपये इतका होता. तो आता ६,५०० हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७५४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४७,५४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar